ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी
दिनांक १६/०८/२०१६
"ब्लॉसमच्या विध्यार्थ्यांनी पोलिसांना राखी बांधुन साजरा केला 'सक्षम बालिका सक्षम भारत' उपक्रम
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे आज नुकताच सक्षम बालिका सक्षम भारत उपक्रम रक्षाबंधन निमीत्ताने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम पोलिस स्टेशन देवरी येथे घेतला गेला या प्रसंगी पोलिस निरिक्षक राजेश तट्करे आणि विभागातील अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची संकल्पना मुख्याध्यापक सुजित टेटे यांची होती. विध्यार्थी स्वतःच्या हाताने तयार केलेले भेटकार्ड देउन आणि राख्या पोलिस विभागातील अधिकाऱ्याच्या हातावर बांधल्या. मुलीना समाजात महत्व मिळावा आणि शालेय जीवनात या गोष्टींचा प्रसार व्हावा या उद्देशाने सक्षम बालिका सक्षम भारत हा उपक्रम सुजित टेटे यांनी राबविला. नक्षलग्रस्त भागात सद्देव सेवा देणारे पोलिस कर्मचारी यांना उपक्रमात सहभागी करून समाजाला संदेश देण्याचे महत्वचे कार्य करण्यात आले.
उपक्रमाच्या यशासाठी नितेश लाडे , राहुल मोहुर्ले, सरीत थोटे , हर्शदा चारमोडे, हरीश उके, संगिता काळे आणि सर्व शिक्षकांनी सहकार्य केला.
BLOSSOM PUBLIC SCHOOL DEORI
DATE-16/08/2016
No comments:
Post a Comment