LABLES

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

NOTICE

ADMISSION OPEN FOR 2020-2021. CO. 9405241004

Wednesday, September 04, 2019

फक्त परीक्षेसाठी अभ्यास का ?


स्वामी विवेकानंद यांच्या व्याख्येनुसार "आपल्या वागणुकीत  झालेला सकारात्मक बदल म्हणजे शिक्षण." परंतु आजच्या आधुनिक युगात फक्त परीक्षे पुरते अभ्यास असे म्हणायला हरकत नाही. परीक्षा आहे म्हणून अभ्यास करायचा नाही तर काही गरज नाही!आजच्या बदलत चाललेल्या जीवनशैली मध्ये अभ्यासाचे महत्व कमी झाल्याचे दिसायला मिळते. याला  कारणीभूत कोण ?
प्राथमिक शिक्षण असो कि उच्च शिक्षण फक्त ठरविलेली विषय आणि घटक या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमाची तयारी केली कि झाली परीक्षा. परीक्षेत मिळालेले गुण  म्हणजे आपली गुणवत्ता असला भ्रम सध्या समाजात वेगाने पसरत आहे. प्राथमिक शाळेत शिकत असलेला विध्यार्थ्याला नवी दिशा व दृष्टी देण्याची गरज आहे तिथे आजचा समाज टक्केवारी आणि परीक्षेत मिळालेले गुण  यांच्या मधेच मग्न आहे. फक्त परीक्षेच्या वेळी मुलांना घेऊन बसने पैकीच्या पैकी गुण संपादन करणे आणि आनंदोत्सव साजरा करणे हेच का शिक्षण?
      
देशाचा विकास हा  त्या देशातील सुशिक्षित व सुसंस्कृत विध्यार्थ्यावर अवलंबून असतो. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीत शिक्षणाचा वाटा महत्वपूर्ण असतो.कौशल्य आणि आधुनिक  शिक्षण हि 21 व्या शतकाची गरज आहे.त्यासाठी आपण अभ्यासक्रम, शिक्षकांची गुणवत्ता व मूल्यमापन या तीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिक्षकांना आजच्या बदलत्या शैक्षणिक प्रवाहातील आव्हाने स्वीकारण्यास तयार रहावे लागलेले नेहमीच बघावयास मिळते. परंतु हि फक्त शिक्षकांनीच जबाबदारी का ?
                     एकिकडे  जागतिकीकरण व दुसरीकडे आपल्या राष्ट्रीय संकल्पना  यामुळे शैक्षणिक प्रवाहात वेगाने बदल होत आहेत. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे शिक्षकांपुढील एक आव्हान आहे कारण गुणवत्ता ही आपणास भौतिक कसोट्यावर मोजता येत नाही. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान व कौशल्ये यांचा विकास नसून त्यात मूल्य,अभिवृत्ती व भावनात्मक बाबींचा समावेश होतो.प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिपूर्ण प्रयत्न करणे ही शिक्षकांची खरी कसोटी आहे.गुणवत्तेचा शोध घेणे ही न संपणारी प्रक्रिया आहे. आणि हि प्रक्रिया फक्त परीक्षा घेऊन सिद्ध करता येत नाही. कारण परीक्षेमध्ये फक्त एका क्षेत्राचे मूल्यमापन करता येते. 
                   शैक्षणिक मूल्यमापण विषयक अडचण एक मोठी समस्या आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट्ये व ध्येये साध्य करताना मूल्यमापन अपरिहार्य आहे.पण त्यात भरपूर अडचणी आहेत.अभ्यासक्रम एकांगी आहे,शहर व खेडे यात अनेक बाबतीत भिन्नता असल्यामुळे शहरातील व खेड्यातील मुलांना एकच अभ्यासक्रम योग्यठरू शकत नाही. गुणवत्ता हि विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित मानली तरी बोधात्मक,भावात्मक व क्षमता यांचा त्यात समावेश होतो.प्रत्येक विद्यार्थ्यांचे परीक्षेतून मूल्यमापन करणे कठीणच आहे.
                       भारतीय शैक्षणिक क्षेत्राला हजारो वर्षाचा इतिहास व उज्वल परंपरा आहे.अनेक अडचणीवर मात करून शिक्षकांनी नेहमी नाविन्याचा ध्यास घेतलेला आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहात शिक्षकांपुढील आव्हाने म्हणजे आजच्या पालककेंद्रित झालेल्या शिक्षणातील समस्या दूर करून अभ्यासाचे महत्व फक्त परीक्षे पुरते मर्यादित नाही तर जीवनातील सकारात्मक बदल सतत तेवत ठेवण्यासाठी सर्वतोपरीने अभ्यास करणे गरजेचे आहे.


प्राचार्य डॉ . सुजितकुमार टेटे
ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी