देवरी:०५ ऑगस्ट, आईएसओ मानांकन प्राप्त व लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 'सक्षम बालिका, सक्षम भारत' प्रकल्पांतगत देवरी पोलिस स्टेशनला भेट दिली. सदर प्रकल्पाचे आयोजन विविध शालेय संकल्पना आणि उपक्रमा साठी आद्य कर्त्तव्य समजणारे शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटेयांनी रक्षाबंधनच्या पार्शभूमिवर केले. विध्यार्थिनीची शिक्षणातील प्रगती आणि समजातील स्थान उंचावण्याच्या उद्देशाने ब्लॉसम पब्लिक स्कूलमधे 'सक्षम बालिका,सक्षम भारत' प्रकल्पाची सूरवात मागच्या वर्षी पासुन करण्यात आली. यावेळी देवरीचे कर्तव्यदक्ष व विध्यार्थीप्रेमी पोलिस अधिकारी ठाणेदार राजेश तटकरे आणि सहाय्यक पोलिस अधिकारी नागेश भाष्कर यांनी मार्गदर्शन केला प्रत्यक्षात एक एक विभागाची माहिती पोलिस खात्याचे विविध कक्ष आणि चालणारा कारभारा ची माहिती सांगितली. बालिका सक्षम करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था या गोष्टीचे ज्ञान शालेय जीवनात असने आवश्यक आहे त्यामुळे पोलीसांच्या कार्यपद्धतीचे माहिति जाणून घेणे काळाची गरज आहे. पोलिस खाते म्हनजे समाजाचे एक घटक! चोविस तास समाजाची सेवा करत असतांना सामान्य नागरिकाप्रमाने त्यांना आपल्या कटुंबासोबत सण साजरे करता येत नाही. रक्षाबँधनाच्या पर्वावर ही भेंट आयोजित केल्याने चिमूकल्या विध्यार्थीनिंनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यानां राख्या बांधून ऋणानूबंध आणखी घट्ट केले. या वेळी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी विध्यार्थिनिनी दाखवीलेल्या स्नेहाने भारावून गेले. विध्यार्थीनिंना त्यांच्या सुरक्षितेची हमी या वेळी देवरी पोलिसांनी दिली. या भेटिला मूर्तरूप देण्यासाठी नितीन शिरपुरकर पोलिस कर्मचारी, शिक्षक राहुल मोहुर्ले, नितेश लाडे, वैशाली टेटे, वैशाली मोहुर्ले, हर्षदा चारमोडे विश्वप्रित निकोड़े आदि शिक्षकांनी सहकार्य केले.
ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी
विध्यार्थिनिंनी पोलिसांना बांधल्या राख्या
|
No comments:
Post a Comment