71st INDEPENDENCE DAY 2017
DEORI: ISO certified Blossom Public school celebrated 71st Independence Day enthusiastically. For this auspicious occasion Principal Mr. Sujit H. Tete , Secretary Mr. Nirmal Agrawal , Chief Guest Ma. Arya Mohurle and Guest Of Honour Miss Purva Chandewar were present. This year also Student hoisted Flag At school. This concept of Principal Sujit Tete to increase the more faith towards Nation and to learn reality behind such National Festivals.
All Teachers strove to success this Festival.
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे आपली परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या हातून ध्वजारोहन करण्यात आला. विद्यार्थ्यांना खऱ्या लोकशाहीचे धडे शाळेतच शिकायला मिळायला पाहिजे आणि देशाविषयीचा अभिमान शालेय पातळीवरचं जागृत झाला पाहिजे या उद्देशाने मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी शालेय निवडणूक अगदी राजकीय पद्धतीनुसार लढविली होती. निवडणुकीत विजयी झालेले विध्यार्थी प्रतिनिधी आर्या राजेंद्र मोहुर्ले आणि पूर्वा आनंद चांदेवार या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण पार पडले.
या प्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल मुख्याध्यापक सुजित टेटे, आर्या मोहुर्ले विध्यार्थी प्रतिनिधी आणि पूर्वा चांदेवार विद्यार्थिनी प्रतिनिधी उपस्थित होते.
नियोजित वेळेवर शालेय पटांगणावर विध्यार्थ्यांनी ध्वजारोहण केला. स्वागतगीत, देशभक्ती गीत गायन करून विध्यार्थ्यांनी देशा विषयची भावना व्यक्त केली. डंबल्स समूहाने आपापली कृती कवायत सादर केली.
विध्यार्थी जीवनात खरी लोकशाहीची बीजे रोवली जावी , एखाद्या आमदार खासदार प्रमाणे विध्यार्थ्यांना सुद्धा ध्वजारोहण करता यावी, देशा विषयी चा आदर आणि अभिमान शालेय जीवनापासून चिरकाल टिकून राहावे या संकल्पनेतून सदर ध्वजारोहण सोहळा पार पडला.
सूत्रसंचालन विश्वप्रित निकोडे नी केला आभार प्रदर्शन वैशाली मोहुर्ले नी मानला. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केला.
No comments:
Post a Comment