PRINCIPAL SUJIT TETE & COACH RAHUL MOHURLE |
देवरी: 05 सप्टेंबर ब्लॉसम पब्लिक स्कुल आपल्या वेगवेगळ्या उपाक्रमासाठी नेहमीच चर्चेत असते. बौद्धिक स्पर्धा असो वा क्रीडा स्पर्धा, नृत्य असो वा गायन, गुणवत्ता शिक्षणा पासून तर दप्तराच्या ओझा कमी करण्याच्या विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या विध्यार्थ्यांना घडविणारी नक्षलग्रस्त तालुक्यातील एक लोकप्रिय शाळा. मुख्याध्यापक सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात आगळे वेगळे सहशालेय उपक्रम आणि त्यामधून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास कसा घडविता येणार याचे वेळोवेळी कार्यशाळा राबवून विध्यार्थ्यांना घडविण्याचे प्रयत्न चालविले जातात. महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात शाळेतील 5मुले आणि 5मुली सहभागी झाले होते.10 पैकी 10 विध्यार्थी तालुक्यातून अव्वल आले आणि शिक्षक दिनी गुरु दक्षिणाचं दिली. जिल्हास्तरीय स्पर्धे साठी यांची निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक राहुल मोहुर्ले यांच्या प्रशिक्षणामुळे स्पर्धक अनिकेत शाहू, रचिकेत शाहू, हर्षित अग्रवाल, श्याम अग्रवाल आणि राजवर्धन उके. मुली मध्ये पूर्वा चांदेवार, सिद्धी थोटे, ऋतुजा देशमुख, गुंजन भांडारकर आणि विधीसा गर्ग यांची निवड झालेली आहे. विजेत्या सर्व स्पर्धकांनी यशाचे श्रेय मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि पालकांना दिले.